
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेडच्या प्रवीण बियाणी यांच्या निर्मिती व संकल्पनेतून साकारलेला ‘गैरी ‘हा चित्रपट महाराष्ट्रातील सर्व रुपेरी पडद्यावर दिनांक 16 डिसेंबर रोजी झळकणार असून या चित्रपटाचा सर्व चाहत्यांना ,श्रौत्याना आवर्जून पाहण्यासारखे आहे ,तो पाहाण्यासाठी गर्दी करावी असे आवाहन अनिल कांबळे सहशिक्षक यांनी केले आहे
या निमित्ताने पुन्हा एकदा नांदेडच्या मातीचा सृजनशिल दरवळ संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. प्रवीण बालाजीप्रसादजी बियाणी हे नाव नांदेडकरांना विविध अंगाने परिचित असं नाव आहे .याच प्रवीण बियाणी यांनी आदिवासी समाजाचे जगणं, वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि एकूणच या क्षेत्रातील प्रवृत्तीचा गैरी या चित्रपटातून वेद घेतला आहे.
नायगाव तालुक्यातील कृष्णूर या खेडेगावातील पांडूरंग जाधव या(शिक्षकांनी ) या चित्रपटाच लेखन, कथा,पटकथा,संवाद, दिग्दर्शन केले आहे.मयुरेश पेम,आनंद इंगळे,नम्रता गायकवाड, देविदास दफ्तकार,केतन पवार ,सुनील देव,प्रणव, समीर खांडेकर आदि प्रतिभाशाली अभिनेत्यांचा अभिनय ,सुप्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूर यांची गीते आणि अमित राज यांच अफलातून संगीत ही गैरी या चित्रपटाची वैशिष्ट्ये आहेत. प्रदर्शनापुरवीच कौतुकास्पद पात्र ठरलेला हा चित्रपट आहे.केवळ मनोरंजनच नव्हे तर सामाजिक जाणीवा उत्तेजित झाल्या पाहिजेत अस नेमकेपणानं सांगणारा हा चित्रपट प्रवीण बियाणी या युवकाचा अभिजात कलाविष्कार आहे म्हणूनच प्रवीणच्या पहिल्यांच प्रयत्नाचे व दिग्दर्शक पांडूरंग जाधव ( शिक्षक )यांच्या नांदेडकर व संपूर्ण महाराष्ट्र नक्कीच भरभरून स्वागत करतील गैरी हा चित्रपट पहातिल असा विश्वास दिग्दर्शक पांडूरंग जाधव यांचे स्नेही मित्र अनिल कांबळे ( शिक्षक ) यांनी हा चित्रपट पहावा असे आवाहन केले आहे. आदिवासी पाड्यातील समस्या,आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करणे.दुर्लक्षित बांधवाकडून ज्यानी शिक्षण घेवून आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी इतर ठिकाणी शिक्षण घेऊन ,प्रयत्नांची पराकाष्ठा करून आदिवासी पाड्यातील मुलगा ( विद्यार्थ्यी ) डॉक्टर होवून समाजाची सेवा ,विकास ,समाजकार्य, समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी धडपडतो अशा प्रकारे अदिवासी याच्या समस्या गैरी या चित्रपटातून मांडल्या आहेत.