
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
जागतिक दिव्यांग दिन सोहळा-2022
समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नांदेड यांच्या विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव,समता पर्व आणि जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने-
दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये निवासी अपंग कर्मशाळा मुखेडच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन बसुन चालणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 50 मिटर धावण्याच्या स्पर्धेत ज्ञानेश्वर डाकोरे हा विद्यार्थी प्रथम तर तुकाराम गुरमुलवाड हा तृतीय क्रमांक पटकावला आहे,100 मिटर धावण्याच्या स्पर्धेत रत्नदिप सोनकांबळे हा तृतीय व 200 मिटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे तसेच गोळाफेक स्पर्धेत ज्ञानेश्वर गुरमुलवाड यांने प्रथम पदकांच्या कमाईसह शाळेच्या विद्यार्थांनी पाच पदकांची कमाई केली आहे.शाळेच्या विद्यार्थ्यांचे श्री.सत्येंद्र आऊलवार समाज कल्याण अधिकारी, जि.प.नांदेड व शाळेचे अध्यक्ष, श्री. रमेश वडगांवकर साहेब यांनी कौतुक केले आहे .विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, श्री.शामराव शिरबरतळ,श्री. दत्तात्रय निम्मलवाड,मारोती बत्तलवाड,राम दासेवाड यांनी परिश्रम घेतले.