
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर: देगलूर शहरात मागील अनेक दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांची रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली जात असून वारंवार होणाऱ्या या चोरींच्या घटनांमुळे मात्र पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी शंका व्यक्त करीत नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
मागील अनेक दिवसांपासून चोरट्यांनी देगलूर शहरात उच्छाद मांडला असून काही दिवसांपूर्वी मोंढा भागातील तीन अडत दुकानांसह एक किराणा दुकान फोडण्यात आले होते. त्याचा तपास जैसे थे असतानाच आहे. शारदानगर भागातील मुनगीलवार यांच्या घरी झालेली चोरी, तुकारामनगरी भागातून ११ लाखांच्याटिप्परची चोरी यासह नुकतेच आनंदनगर आणि टेकाळे गल्ली या दोन ठिकाणी झालेली घरफोडी आदींसह दुचाकी चोऱ्याही वाढतच
कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी
संवेदनशील पोलिस स्टेशन अशी ओळख असलेल्या देगलूर पोलिसस्टेशनसाठी एकूण १०३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी आज घडीला ६९ कर्मचारी कार्यरत असून १० कर्मचारी है संलग्न म्हणून जोडले गेल्याने शहरासह ६६ गावांच्या सुरक्षेचा भार ५९ अधिकारी- कर्मचाऱ्यांवर येऊन ठेपला आहे. ही संख्या अपुरी पडत आहे.एक लाखाच्या
जवळपास लोकसंख्या असलेल्या देगलूर शहराच्या सुरक्षेसाठी देगलूर नगर परिषदेने सन २०१९ साली नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत ४० लाख ३३ हजार एवढी रक्कम खर्च करून शहरातील ४३ ठिकाणी ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते; परंतु, या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची योग्यरीत्या देखभाल करण्यात आली नसल्याने बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. आजच्या काळात गुन्हेगारांना पकडण्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मोठ्या प्रमाणात मदत होत असते. मात्र, ही यंत्रणाच बंद पडल्याने पोलिस प्रशासन गुन्हेगारांनाकसे जेरबंद करणार, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.