
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या पंचायत समिती कार्यालय किनवट येथील कार्यालय प्रमुख गटविकास अधिकारी हे दर शुक्रवारीअर्ध्या दिवसाची सुट्टी नघेताच दुपारी नंदिग्राम एक्स्प्रेसने नांदेडला रवाना झाल्याने पंचायत समिती कार्यालय हे दुपारनंतरओस पडले होते.सेनापती गेल्यावर सैन्याची जीअवस्था होते.त्या सारखींचअवस्था या कार्यालयाची दिसतआहे.३०ते३५ कर्मचारी संख्याअसलेल्या या कार्यालयात मोठ्या मुश्किलीने १० ते १५कर्मचारी हे उपस्थितअसल्याचे दिसत होते. ग्रामीण भागातून मोठ्या आशेने काम घेऊन आलेल्या नागरिकांना कामे नहोता हात हलवत रिकाम्या हातानेच परतावे लागले,यांची खंतअनेक ग्रामस्थांनी सदर पत्रकाराशी बोलताना व्यक्त केली.शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतर कार्यालयाची वेळही बदलली होती.सायंकाळी ५:४५ पर्यंत कार्यालय सुरू असते.परंतु अनेक कर्मचारी हे दर सोमवारी सकाळी उशिरा कार्यालयात येतात,तर दर शुक्रवारी दुपारी बारानंतर कार्यालय सोडतात.किनवट हा आदिवासी, डोंगराळ व दुर्गम तालुकाअसूनही कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती संबंधाने आम्हचे लोकप्रतिनिधीं हे गंभीर नसतात.अर्थात त्यांचा याशी संबंध येत नसल्याने ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात.यामुळे कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार वाढत चालला आहे.पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे मिटींग किंवा दौऱ्याच्या नावावर अनेकदा कार्यालयात गैरहजर असतात.त्यांनी फक्त नावालाच येथे एक सिंगल रुम घेतलेलीआहे.त्यांचे कुटुंब हे नांदेडलाचं रहातअसल्याने नेहमीच त्यांना नांदेडचीच ओढ लागलेलीअसते.यातच त्यांची सेवानिवृत्तीजवळआल्याने ते कसेबसे आता ते येथे दिवस काढतआहेत.हा प्रकार त्वरीत थांबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष व कर्तबगार मुख्य कार्यकारीअधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावें.अशी एकमुखी मागणी ग्रामीण भागातील जागृत ग्रामस्थांतून होतआहे.