
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा शहरातील जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक सुभाष सावकार सुर्यवंशी यांचे अल्प आजाराने निधन झाले .
दि. 29रोजी पाहाटे 5 वाजता सुभाष सावकार सुर्यवंशी यांना पॅरेरिशीश चा अॅट्याक आल्यानंतर त्यांना उपचारासाठी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दि. 29 रोजीच त्यांचे नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,३ मुले 1 मुलीगी ,दोन भाऊ, तीन चुलत भाऊ , सुना,जावई, नातू असा मोठा परिवार आहे.
ते लोहा न.पा.चे नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांचे वडील होते .तर माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी यांचे छोटे बंधु होते व माजी उपनगराध्यक्ष रामराव सुर्यवंशी यांचे चुलत बंधू होते.
कालवश सुभाष सावकार सुर्यवंशी यांच्या पार्थिवावर दि.२९ रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या हळदव येथील शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेला मोठा जनसागर उसळला.
यावेळी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण, विक्रांत दादा शिंदे,मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, उपाध्यक्ष दता वाले, नगरसेवक बबनराव निर्मले,शरद पवार, नबीसाब , संभाजी पाटील चव्हाण, संदिप दमकोंडवार ,छत्रपती धुतमल, गटनेते करीम शेख, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माणिकराव मुकादम, जि.प. सदस्य चंद्रसेन पाटील, मन्नान चौधरी, शिवाजी आंबेकर, शिक्षक नेते हरीभाऊ चव्हाण, यांच्या सहीत सर्व नगरसेवक ,लोहा ,न.पा.चे कर्मचारी, कंधारचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, माजी जि.प. सभापती संजय पाटील कराळे, रंगनाथ भुजबळ, शिवा संघटनेचे लोहा तालुका अध्यक्ष हनुमंत भाऊ लांडगे, लोहा ,कंधार ,पं.स.चे माजी सभापती, उपसभापती, सदस्य, लोहा शहरातील सर्व डाॅकटर, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक , व्यापारी,
यांच्या हजारोंच्या संख्येने नागरिक, महिला आदी उपस्थित होते.
लोह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद
लोहा शहरातील जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक सुभाष सावकार सुर्यवंशी यांच्या निधनाची वार्ता समजताच लोहा शहरातील व्यापाऱ्यांनी आपले दुकाने , प्रतिष्ठाने बंद ठेऊन सुभाष सावकार सुर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
लोहा पत्रकार संघाच्या वतीने सुभाष सावकार सुर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
________________________________
लोहा शहरातील जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक सुभाष सावकार सुर्यवंशी यांच्या निधनाची वार्ता समजताच लोहा शहरातील सर्व पत्रकार बांधवांनी तीव्र दुःख व्यक्त करुन सुभाष सावकार सुर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.