
दैनिक चालू वार्ता आर्णी प्रतिनीधी -श्री,रमेश राठोड
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आर्णि तालुक्यातील मोठी लोकवस्ती असलेल्या वरुड(भक्त) येथे भ्रमणध्वनी मनोरा नसल्याने,मागील अनेक दिवसांपासून या गावातील नागरिकांनी मोबाईल ग्राहकांना तथा स्वस्त धान्य दुकानदारांना ऑनलाइन स्वस्त धान्य वाटप करताना कव्हरेजची समस्या जाणवत आहे,गावात कव्हरेज नसल्यामुळे स्वस्त धान्य लाभार्थ्यांना गावाबाहेर बोलाऊन लाभार्थ्यांची थम घ्यावे लागत असल्याची नाराजी स्वस्त धान्य दुकानदारांनी व्यक्त केली, गावात कव्हरेज नसल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार तथा लाभार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो,कव्हरेज नसल्यामुळे स्वस्त धान्य वाटप प्रक्रियेला विलंब होतो,गावातील नागरिकांना मोबाईल वरून संभाषण करण्यासाठी घराच्या छतावर उभे राहून किंवा गावाबाहेर दोन ते तीन किलोमीटर बाहेर जाऊन संभाषण करावं लागतं,या गावाला चौफेर जंगल असल्याने या गावांमध्ये शासनाच्या सोयी सुविधा पोहोचलेल्या नाहीत,गावामध्ये मागील काही दिवसात मोबाईल ग्राहकांची संख्या वाढल्याने गावामध्ये टॉवर उभारावे अशी मागणी वरुड भक्त गावातील नागरिकांनी केली आहेत,