
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा दवणे..
मंठा तालुक्यातील गावागावात बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.या वेळी तालुक्यातील हेलस,मंठा येथील वार्ड क्र.17 मध्ये तालुकाप्रमुख उदय बोराडे यांच्या सह शहर प्रमुख गणेश बोराडे,उप तालुकाप्रमुख गजानन कापसे,ओबीसी सेल तालुकाप्रमुख चांद पठाण, दलीत आधाडी तालुकाप्रमुख दीलीप हिवाळे युवासेना उपतालुकाप्रमुख लिंबाजी बोराडे,युवा सेना शहर प्रमुख अँड राजेश खरात,विष्णू वायाळ,स्वप्निल पुणेकर यांचा शाल,हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी सत्काराला उत्तर देताना तालुकाप्रमुख उदय बोराडे म्हनाले तुम्ही केव्हाही हाक दया मी तिथे उभा राहील. यांनी उपस्थितांचे आभार मानले व तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने शासन दरबारी पर्यंत करू तसेच नवयुवकांसाठी शासकिय योजनाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार या वेळी बोलून दाखवला.
या प्रसंगी विनोदराव केंधळे , बाबासाहेब चव्हाण,गणेश खराबे यांच्या सह अनेक नागरिकांची उपस्थिती होती