
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा. तालुक्यातील खरीपातील सर्वच पिकांनी शेतकऱ्यांची निराशा केली. खरीपातील शेवटचे पीक असलेल्या तुरीवर शेतकऱ्यांची दारोमदार होती. खरीपातील काही अंशी तूट भरून निघुन दिलासा मिळेल, असे चित्र होते. तुरीचे पीक जोमात असल्याने शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतू तुरीही निराशा करण्याची चित्र दिसू लागले कारण
ढगाळ वातावरण असल्यामुळे अळी कीड रोगाचा प्रादुर्भाब दिसून आला त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वाढली आहे. तालुक्यात कोरडवाहू तुरीचे पीक भरपूर प्रणात घेतले जाते . परंतू यंदा सुरुवातीपासून रब्बीच्या सर्वच पिकाला फटका बसला दर्जावरही परिणाम झाला.आहे. मूग, उडीत सुरवातीलाच पहिल्या पावसात गेले स्वायाबीनवरही त्याचे परिणाम झाल्याने उत्पादनात घट झाली आणि दर्जाही घसरला आता शेवटच्या टप्प्यात असलेल्या तुरीवरही पावसाचा व ढगाळ वातावरनाचा फटका बसला आहे.बदलत्या वातावरणाने तुरीवर अळ्या मरेरोगाचा प्रभाव वाढत आहे. महागडी औषधे वापरूनही कीड नियंत्रणात येत नसल्याचे चित्र दिसत आहे.औषध फवारणीचा खर्च वाढला असून त्या तुलनेत उत्पन्नाची हमी मात्र काहीच नाही या कारणाने शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे तूर हे पीक खरीपातील शेटचे पीक आहे मधन्तरी अतिवृष्टीचा पिकावर फरसा परिणाम झालेला नव्हता सद्या हे पीक शेंगाच्या पक्व अवस्थेत असून काही शेंगा भरल्या आहेत काही ठिकाणी अळीने शेंगा पोखरल्या आहेत यातच झाड अच्यानक वाळूत असून फुले शेंगा गळून जात आहे या मरेरोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतात उभ्या तुरीच्या पिकाच्या झाडण्या झाल्या आहेत यामुळे शेतकऱ्याच्या चिंता वाढल्या.