
दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथील किशोरी रामा पाटील वय वर्षे २० विवाहीत महीला दिं.२१-१२ -२०२२ पासून बेपत्ता असल्याची खबर म्हसळा पोलीस ठाणेत महीलेचे वडील रामा रामचंद्र पाटील वय वर्षे ५५ रा.मेंदडी यानी दिं.२६-१२ -२०२२ रोजी दिल्याने म्हसळा पोलीस बेपत्ता मनुष्य राजि ४/२०२२ ने नोंद करून शोध सुरु केला आहे.महीला शौचालयाला जाते म्हणून सांगून गेली ती अद्यापही परत आली नसल्याचे वडीलानी आपल्या तक्रारीत सांगितले.बेपत्ता महीलेचे वर्णन उंची ५ फूट , शरीर बांधा मध्यम,चेहरा उभट,डोळे- केस काळे ,पेहराव जांभळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस आसल्याचे तपासी अंमलदार के.अे.नलावडे यानी सांगितले.