
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:-बौद्ध स्म्शानभूमिची नोंद करा या मागणीसाठी सरणावरच बसून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन असे म्हटले आहे की कांही वर्षांपासून रवींद्र हायस्कूल च्या बाजूला २२१ सर्व्हे नंबर असलेल्या बौद्ध सम्शानभूमिचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सदरील जागेवर पिढ्या न पिढ्या बौद्ध समाजाची स्म्शान भूमि आहे पण अद्याप त्याची नगरपरिषदेकडे नोंद नाही. यासंदर्भात ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड हे १४/२२ ऑगस्ट रोजी स्म्शानभूमीतच सरणावर आमरण उपोषणास बसले होते. त्यावेळी प्रशासनाने त्यांना लेखी दोन महिन्यात सर्व त्रुटी दूर करुन प्रस्ताव जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना पाठवतो असे आश्वासन दिले होते पण ४ महिने उलटूनही अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. न. प. भूम ने ही स्मशानभूमीवर असलेले बागेचे आरक्षण रद्द करुन नवीन विकास आराखडा मध्ये ही जागा 0.46 आर बौध्द सम्शान भूमि साठी आरक्षित केली आहे.त्यामुळे ही जागा बौद्ध समाजाच्या स्मशान भूमिसाठी देण्यास कोणतीही अडचण नाही असे निवेदकांचे म्हणणे आहे. या होत असलेल्या दिरंगाई विरोधात पुन्हा स्मशान भूमीत सरणावर बसून आमरण उपोषण व आत्मदहन करण्याचा इशारा चंद्रमणी गायकवाड यांनी निवेदनद्वारे दिला आहे. त्यांची मागणी आहे की २५ जानेवारी पर्यंत ही जमीन न. प भूम यांना अधिगृहीत करावी अन्यथा उपोषणास बसणार असल्याचे म्हटले आहे.