
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम-तालुक्यातील हाडोंग्री येथील भगवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक अण्णासाहेब बाबुराव तळेकर हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला आहे. धनाजीराव सावंत माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद उस्मानाबाद, यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे ,बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उस्मानाबाद, प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार उषा किरण शृंगारे , तानाजी चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका भूम, राहुल भट्टी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भूम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी मुक्तप्पा तळेकर माजी पंचायत सदस्य, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख दत्ता मोहिते, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ, युवराज तांबे बाजार समिती चे संचालक, उमेश नायकिंदे सरपंच पाटसांगवी, समाजरत्न रविंद्र लोमटे,समाधान सातव माजी सरपंच देवळाली, युवराज तांबे संचालक त्रिमूर्ती प्रसारक मंडळाचे सचिव एस एल घोंगडे,अप्पाराव चकोर, बिभीषण कदम,एड नागेश तळेकर,दिपक तळेकर, काकासाहेब डोरले, प्रसिद्ध व्याख्याते साईनाथ रूद्रके, डॉ प्रशांत स्वामी,शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष राम दाईगंडे,भरत सुरवसे, सरपंच सुधीर क्षीरसागर,आश्रुबा कदम, प्रशांत कदम मुख्याध्यापक एन बी डंबरे यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी रमेश सुतार,श्रीमंत शिंदे, रामा सुरवसे,प्रकाश भाले, सचिन गोवर्धन,गणेश खरात, सुनिल डोके बप्पा टेकाळे, रेवण बिडवे,कवडे मॅडम,कमलाकर पोतदार शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आभार व सुत्रसंचलन प्रकाश पवार यांनी केले.