
दैनिक चालु वार्ता भूम प्रतिनिधी – प्रदीप साठे
तूकोबांना जीवनात खूप त्रास झाला, संतांनीही धार्मिकतेतही महिलांना अग्रहक्काच स्थान दिलय, सामंप्रदायत मोठी ताकद आहे,ते आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड देतात, संकटे येत असतात त्याला पलटून लावण्याची मानसिकता अंगि ठेवा असे एक वारी समतेची निमित्त जगविख्यात संत तुकाराम महाराज यांचे वंशज , विठ्ठल मंदिर पंढरपूर संस्थान सदस्य ह.भ.प.शिवाजीराव मोरे महाराज यांनी संबोधित केले
मंगळवार दिनांक ३ जानेवारी २०२३ रोजी चोखोबा ते तुकोबा ही एक वारी समतेची
दिंडिचे शहरात आगमन होताच पंचायत समिती सभागृह येथे गावकऱ्याच्या वतीने स्वागत करण्यात आले .प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प गुच्छ अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी व्याख्याते प्रा. अलकाताई सपकाळ , दै तरुण भारतच्या उपसंपादिका योगिता साळवे मुंबई , भूम न .प मुख्याधिकारी तानाजी चव्हाण , रमेश पांडव सर , प्रमोद बाकलीकर , श्रीकृष्ण पाटिल , निलेशजी गद्रे , विधिज्ञ वाल्मीक निकाळजे आदिंची उपस्थिति होती.
यावेळी जनविकास सामाजिक बहुउदेशिय संस्थेच्या वतीने स्री सन्मान दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील उत्कृष्ट बचत गटांचा मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. यामध्ये अस्मिता महिला बचत गट , वैभवी लक्ष्मी महिला बचत गट , आनंद महिला बचत गट , सत्यमेव जयते दिव्यांग महिला बचत गट , जय जगदंबा महिला बचत गट , गोपाळकृष्ण महिला बचतगट , संयोगिता महिला बचत गट , अजिंक्य महिला बचतगट , महालक्ष्मी महिला बचत गट या गटाचा समावेश होता.
प्रत्येक क्षेत्रात स्त्रीयांनी इतिहास रचला , तिचा समाज स्तरावर सन्मान झाला पाहिजे , स्रीयांनी स्वावलंबी व्हावे असे आवाहन व्याख्याते प्रा. अलकाताई सपकाळ यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी बचत गटातील महिलांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जनविकास सामाजिक बहुउददेशीय संस्थेचे कार्यवाहक प्रदिप साठे यांनी केले तर आभार तात्या कांबळे सर यांनी मानले. तर कार्यक्रमासाठी सचिव संजय गायकवाड , हेमंत देशमुख , बाबा वीर श्रीपाद देशमुख शंकर खामकर सचिन क्षिरसागर , चंद्रकांत गवळी , संजय शाळू , मनोज क्षिरसागर , गणेश कुलकर्णी , रुषिकेश सकनूर, सुधिर बिक्कड आदिनी सहकार्य केले. कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने केला.