
दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी-शिवकुमार बिरादार
मुखेड येथे लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने
डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे दि ३ जानेवारी रोजी सांय. ७ वा. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. तर त्यानंतर निवडी बद्दल मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय कांबळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक पतसंस्थेचे नवनिर्वाचित संचालक
दिलीपराव देवकांबळे, राज्यस्तरिय साविञीबाई फुले पुरस्कार प्राप्त शिवाजी कराळे ,
गट शिक्षण अधिकारी डी.के.तोटरे
,सेवानिवृत विस्तार अधिकारी एन.एस. गायकवाड, दिगांबर ढवळे, अविनाश तलवारे,चंद्रकांत कहाळेकर, लसकमाचे राज्य कोषाध्यक्ष पी.एल.दाडेराव, हेमंत घाटे, पि.जी. सुर्यवंशी , सरपंच आत्माराम तलवारे, किशनराव सुर्यवंशी, बाबुराव गायकवाड, आर.पी.शेळके,बालाजी तलवारे,
व्यंकट पविञे, नागोराव रेड्डी , गणपतराव चव्हाण, चांदोबा सागरे, गुपित कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्या नंतर शिक्षक पतसंस्थेचे नवनिर्वाचित संचालक निवडीबद्दल दिलीपराव देवकांबळे, राज्यस्तरीय साविञीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शिवाजी कराळे , मराठवाडा शिक्षक संघाचे तालुका अध्यक्षपदी निवडीबद्दल दत्तात्रय कांबळे, अखिल भारतीय साहित्य परिषदेवर निवडीबद्दल
चंद्रकांत कहाळेकर, आदर्श गुरु गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल अविनाश तलवारे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुञसंचलन लसाकम तालुका अध्यक्ष गंगाधर ननुरे यांनी केले.