
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कलंबर :- संजय गांधी माध्यमीक व उच्च माध्यमीक विद्यालय कलंबर ता.लोहा येथे कै.निवृत्तीराव पाटील घोरबांड यांच्या जयंती निमित्त हरि किर्तन सोहळ्याचे आयोजन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शाळेतील विद्यार्थीनीना सायकल वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.दि.४ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती मुद्रीकाबाई निवृत्तीराव पाटील घोरबांड (सचिव समाज उन्नती शिक्षण संस्था,कलंबर) प्रमुख पाहुणे मा.श्री.मारोतीराव निवृत्तीराव पा.घोरबांड(अध्यक्ष:समाज उन्नती शिक्षण संस्था कलंबर)यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार झी टाॅकीज फेम ह.भ.प.भागवताचार्य रूपालीताई सवने परतुरकर जि. जालना यांच्या किर्तनाचे आयोजन केले होते. या किर्तनामध्ये भागवताचार्या ह.भ.प.रूपालीदिदी सवने परतूरकर यांनी आई व वडील यांची सेवा करा .थोर महापुरुषाचे गुण अंगीकारा बाजीप्रभू देशपांडे, स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी माहिती सांगितली तसेच बाप काय असतो ते बाप गेल्यानतंरच समजतो .ज्यांना बाप आहे अशांना त्याची किंमत कळत नाही.बाप आपले दु:ख न दाखवता मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन पालनपोषण करीत असतो.त्यामुळे सर्वानी आईवडीलांची सेवा करा असे त्यांनी हरी किर्तनामध्ये सांगितले.त्यानतंर इयत्ता बारावीतील(कलाशाखा) गुणवंत विद्यार्थी-कु.मोरे किरण बाबुस(प्रथम),कु.बळवदे विद्या गोपाल (द्वितीय),कु.वडजे ज्योती गणेश (तृतीय) व इयत्ता बारावी (विज्ञान शाखा) गुणवंत विद्यार्थी-कु.शिंदे भाग्यश्री सुधाकर(प्रथम),कु.तेलंगे अंकिता बळीराम (द्वितीय),कु.भगीले वैष्णवी शिवपालसिंह(तृतीय), इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी-कु.हिप्परगे मंगल बालाजी (प्रथम),कु.जायनुरे प्रतिक्षा माधव(द्वितीय),पळसे संतोष ज्ञानोबा (तृतीय), इयत्ता ४ वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी-कु.वैभवी बालाजी पोकलवार, प्रमोद शशिकांत भोकरे, इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती पात्र-कु.योगीता साईनाथ तेलंगे, इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती पात्र-पांडुरंग बालाजी पळसे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना अवार्ड देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाला कलंबर व परिसरातील सर्व विद्यार्थी,पालक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ईयत्ता आठवीतील २६ विद्यार्थिनींना रूपालीदिदी सवने यांच्या हस्ते मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या.महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे अध्यक्ष श्री.मारोतीराव पाटील घोरबांड साहेब यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक,अध्यापक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलंबर ता.लोहा जि.नांदेड,संजय गांधी वरिष्ठ महाविद्यालय, कलंबर,ता.लोहा जि.नांदेड,कै.बळीराम पाटील प्राथमिक शाळा,भोपाळेवाडी यांनी कै.निवृत्तीराव पाटील घोरबांड साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.