
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्यातील मरखेल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हणेगाव येथे मटक्याच्या दोन अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत देगलूरच्या मटकाकिंगसहित दोन आरोपींना पकडले.
नांदेडच्या गुन्हे शाखेत कार्यरत पोलिस उपनिरीक्षक गोविंद मुंडे व त्यांच्या टीमने दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हणेगाव बसस्थानकाशेजारी बबलू मुजावर (रा. हणेगाव) हा मटका घेणारा व बबलू टेकाळे (रा. देगलूर) हा मटका मालक या दोघांना पकडत त्यांच्याकडून मटक्याच्या चिठ्यासह साहित्य व रोख रक्कम १३ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर याच परिसरात कल्याण नावाचा मटका चिठ्ठयावरसाहित्य व रोख रक्कम १३ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर याच परिसरात कल्याण नावाचा मटका चिठ्ठयावर लिहून खेळविला जात असताना दत्ता पल्लडवाड (रा. हणेगाव) याच्याकडून मटक्याच्या साहित्यासह रोख ७ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पल्लडवाड यांच्यासह मटका मालक बबलू टेकाळे याच्यावर मरखेल पोलिस स्टेशन येथे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.