दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- येथे गेल्या वर्षभरापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी पदी कार्यरत असलेल्या रोहिणी नऱ्हे यांचा व्हॉइस ऑफ मीडिया भूम तर्फे सत्कार करण्यात आला.
उपविभागीय अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भूम – परंडा तालुक्यातील नागरिकांची रखडलेली कामास प्रथम प्राधान्य देऊन कामांचा निपटारा केला. एकही काम प्रलंबित न राहता ते काम मार्गी लावले जाते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लागणारी कागदपत्रे सुट्टीच्या दिवशीही कामे करून विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये याची दक्षता घेतात. उपविभागीय अधिकारी नऱ्हे यांच्या न्याय देणाऱ्या कार्यपध्दतीमुळे नागरिक ही समाधानी असून उपविभागीय अधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात निवेदने देतात. तसेच गेल्या दोन वर्ष कोरोना मुळे श्री क्षेत्र अलमप्रभु यात्रा होऊ शकली नव्हती. या वर्षी अलमप्रभु ट्रस्ट व कांही राजकीय पदाधिकारी यांच्यात मनापानाचे नाट्य रंगले होते. या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांनी भूम पोलीस स्टेशन मध्ये बैठक घेऊन तोडगा काढला त्यामुळे ग्रामदैवत अलमप्रभु यात्रा मोठया उत्साहात व शांततेत पार पडली याचे श्रेय त्यांना जाते.
यावेळी व्हाईस ऑफ मीडिया महावीर बनसोडे , चंद्रमनी गायकवाड, शंकर खामकर, रवींद्र लोमटे, प्रल्हाद अडागळे, रोहित चंदनशिवे, असिफ जमादार, प्रदीप साठे, नवनाथ यादव, दत्ता अहिरे, विश्वनाथ फल्ले, प्रकाश सितापे, तानाजी सुपेकर, अजित बागडे, आशिष बाबर, उदय साबळे उपस्थित होते.


