दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
———————————————————-
मराठवाडा शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार “सूर्यकांत संग्राम विश्वासराव” बुधवार दि. ११ जानेवारी २०२३ दुपारी १ वा., औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी (नामांकन) अर्ज दाखल करणार आहे. यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक पी. एस. घाडगे, श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे सचिव, माजी आमदार जेष्ठ स्वतत्रसेनानी भाई गुरुनाथ रावजी कुरुडे साहेब व मराठवाडा शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी/सदस्य/कार्यकर्ते तसेच पाठिंबा देणाऱ्या सर्व संघटनांचे प्रमुख/पदाधिकारी/सदस्य/कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आपण सर्वांनी “स्वर्ग फंक्शन हॉल, रोझ गार्डन, सलीम अली सरोवर च्याअलिकडे औरंगाबाद येथे सकाळी ११.०० वा.” उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय सरचिटणीस राजकूमार कदम ,
सहसचिव सौ.रेखा सोळूंके ,जिल्हाध्यक्ष व्यंकटराव चिलवरवार ,सचिव रविद्र वाकोडे ,के.का.स.जी.पी.कौसल्ये ,ई.डी.पाटोदेकर
व सर्व केंद्रीय पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष,जिल्हा सचिव, मराठवाडा शिक्षक संघ.यांनी केले आहे.


