दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
रायगड जिल्हा पोलिस अंतर्गत “पोलिस रेझिंग डे” निमित्ताने पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,उप विभागीय अधिकारी प्रशांत स्वामी यांचे आदेशाने म्हसळा पोलिस ठाण्याचे स.पोलिस निरीक्षक संदीपान सोनवणे यांनी आयोजीत केलेल्या महीला सक्षमीकरण व सुरक्षितता तसेच सायबर सुरक्षा जनजागृती अभियान अंतर्गत आयोजीत कार्यक्रमाला म्हसळा एस टी स्थानक,न्यु इंग्लिश स्कूल,अंजुमन हायस्कूल आणि वसंतराव नाईक कॉलेजमध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.विध्यार्थी वर्गाने पथनाट्य सादर करून महिलांना आपली सुरक्षितता आपणच करण्याचे धाडस केले पाहिजे आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी सावध पवित्रा घेऊन त्याचे सुरक्षा बाबत जनजागृती केली.स.पो.नि.संदीपान सोनावणे यांनी महिलांची सुरक्षितता करण्यास पोलिस तर आहेतच पण ज्या वेळी गून्हा घडत असतो त्या वेळी आपणच आपली सुरक्षितता करण्याचे धाडस केल्यास गुन्हेगार गुन्हा करण्यास पुढे धजावणार नाही यासाठी नेहमी सतर्क राहुन सावध पवित्रा घेतला पाहिजे.इंटरनेटच्या जमान्यात (सायबर क्राईम)फसवा फसवीच्या गुन्हात मोठी वाढ झाली आहे.कोणत्याही आमिषाला बळी न पडता मोबाईल,इंटरनेटवर आलेले संदेश लिंक करु नयेत आपली गुप्त माहिती चुकुनही फॉरवर्ड करू नये तसे केल्यास आर्थिक आणि मानसिक दृष्टीने खुप त्रासाचे होते.अशा प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती असलेली लोक आपल्या अज्ञान पणाचा फायदा घेतात त्यांच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन स. पोलिस निरीक्षक संदीपान सोनवणे यांनी माहिती देताना महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी शिक्षण,आरोग्य,नोकरी,व्यवसाय,रोजगार आणि सेवा कार्यात सहभागी होऊन आपली सुरक्षितता आपणच करण्याचे धाडस केले पाहिजे असे मार्गदर्शन केले.आयोजीत कार्यक्रमाला शिक्षक,पोलिस,विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


