
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : प. पू. पंडित जी मिश्रा यांनी गंगाखेड येथील श्री क्षेत्र संत जनाई यांचे आशीर्वाद घेतले. गंगाखेड विधानसभा क्षेत्राचे रासप आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.रेखा गुट्टे यांच्या विनंतीला मान देऊन पंडित जी मिश्रा यांनी हे आशीर्वाद घेतल्याचे समजते.
परभणी येथील लक्ष्मी नगरीत प.पू.पंडितजी प्रदीप मिश्रा यांचा शिव महापुराण कथेचा भव्य असा सोहळा १३ जानेवारी पासून सुरु आहे.
परभणीचे शिवसेना खासदार संजय जी जाधव यांनी न भूतो न भविष्यति अशा या धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले असून तो सोहळा आगामी १७ जानेवारी पर्यंत चालणार आहे. १६५ बाय ७०० चौ.फू.परिघाच्या क्षेत्रात आयोजित जपानी पध्दतीच्या सभामंडपाच्या आत एकही खांब उभा नसल्याचा विक्रम प्रथमतः दिसून येत आहे.
या शिव महापुराण सोहळ्यातील कथा श्रवणाला लाखोंच्या संख्येतील जनसागर ओसंडून वाहत आहे. या कथा श्रवणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या भक्तांना कथा स्थळी जाण्यासाठी परभणी रेल्वे स्थानक व बस वाहतूक तळ येथून ॲटो रिक्षांची मोफतपणे जाणे-येण्याची आयोजकांतर्फे सोय करण्यात आली आहे. परभणी शिवसेनेचे हजारो मावळे आणि श्री छत्रपती संभाजी महाराज मित्र मंडळाचे कार्यकर्ते ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेत आहेत.