
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
============================
आज दि 14 जानेवारी 2023 रोजी भूगोल दिनानिमित्त आणि मकरसंक्रांतीनिमित्त श्री शिवाजी हायस्कूल माणिक नगर येथे संस्कृत शुभेच्छापत्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले.सर्व विद्यार्थी आणि शालेय व्यवस्थापनाचे सहकार्य लाभले. यनिमित्त शाळेचे मुखध्यापक श्री सुधीरभाऊ कुरुडे सर, शाळेचे पर्यवेक्षक श्री नळगे सर, श्री पवळे सर, संस्कृतिक विभागाच्या प्रमुख सौ तिर्थे मॅडम, सौ.दिनकर मॅडम आणि सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. यावेळी चित्रकला शिक्षक श्री अनिल कुमठेकर यांनी परीक्षण केले.भूगोल शिक्षक श्री उपासे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.