
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.
मंठा -गुरुकुल इंग्लिश स्कुल मंठा येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रमाता जिजाऊच्या लेकी वेशभूषेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांचे मनोगत, जिजाऊ आईसाहेब यांच्या जीवनावरील गीत गायनसह विविध कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सतीश कळणे सर व प्रमुख पाहुने म्हणून गजानन आवचार व रघुनाथ राठोड हे उपस्थित होते. तसेच श्री.सतीश कळणे सर यांनी राष्ट्रमाता यांच्या जीवना विषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गोरे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री.पांडे सर यांनी केले. यावेळी सहशिक्षक, सहशिक्षका राठोड मॅडम, कळणे मॅडम, गोरे मॅडम, बोराडे मॅडम, मस्के मॅडम,यांची उपस्थिती होती. यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.