
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-लखाड येथील मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका चोरट्याला अंजनगाव सुर्जी पोलीसांनी अटक केली आहे.कुंदन सुभाष लबडे (वय ३०, मूळ रा.लखाड) असे त्याचे नाव आहे.त्याच्याकडून पाच मोटारसायकल जप्त केल्या असून पोलीसांनी कुंदन लबडे याला ताब्यात घेतले आहे.
पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार १३ जानेवारी २०२३ रोजी पोलीस रात्रीचे सुमारास गस्तावर असताना कुंदन लबडे याच्या जवळ चोरीच्या मोटारसायकली घरी ठेवत असल्याची खात्रीपूर्ण माहिती वरुन कुंदन लबडे याच्या कडून पाच मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.त्यामधे हिरो होंडा कंपनीची सीबीझेड काळ्या रंगाची लाल पट्टा असलेली गाडी क्रमांक एम एच ४० यु ९१२३, दुसरी होंडा शाइन काळ्या रंगाची लाल पट्टा असलेली गाडी क्रमांक एम एच २७ एलएच ७३८६, तिसरी पॅशन प्रो काळ्या रंगाची हिरो कंपनीची विना नंबर गाडी, चौथी हिरो होंडा कंपनीची सिल्वर रंगाची हिरवा पट्टा असलेली क्रमांक एम एच २७ एटी २५३७, तर पाचवी हिरो कंपनीची पॅशन प्रो कलर काळा गाडी क्रमांक एम एच ४० एएस २०३० अशा एकूण पाच मोटारसायकली ज्याची एकूण किंमत दोन लाख तीस हजाराचा मुद्देमाल चोरट्यांकडून जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध भांदवी कलम ४१ (१) (४) नुसार गुन्ह्याची नोंद करून सदर आरोपी कुंदन लबडे ह्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
सदर कारवाई अमरावती पोलीस ग्रामीण अधीक्षक अविनाश बारगड,उपविभागीय पोलिस अधिकारी सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंजनगाव सुर्जी येथील दंबग ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात सपोनि आश्विन राठोड,पोहेकॉ विजय शेवतकर पोहेकॉ कमलेश मुराई,नापोकॉ जयसिंग चव्हाण,पोकॉ विशाल थोरात,पोकॉ शुभम मारकड यांनी कारवाई केली आहे.