
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
वाळूज महानगर- भाजपा प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते चंद्रशेखर बावनकुळे सामाजिक प्रतिष्ठाण व जगदंबा लेबर अँड सेक्युरिटी सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू 50 व्यक्तींना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. सकाळी माणिक हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच सावली मुलींचे अनाथ आश्रम येथे मुलींना अन्नदान करण्यात आले. यावेळी लोकनेते चंद्रशेखर बावनकुळे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दत्ता लुटे ,जगदंबा लेबर अँड सेक्युरीटी सर्व्हिसेसचे बाबासाहेब गायकवाड, अनिल हिवाळे, मिलिंद सिरसाट ,माणिक हॉस्पिटलचे डॉ. मतीन शेख, डॉ. कृष्णा कवाडे , यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.