
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी -विष्णु मोहन पोले
दिनांक 12 10 2023 रोजी
मॉडेल इंग्लिश स्कूल अहमदपूर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली
मकर संक्रमणाच्या पर्वकाळात आकाशात उदित होणाऱ्या भास्करा समवेत दोन तेजपुंज पृथ्वीवर अवतरले त्यात तेजो में विचारांचा स्वीकार प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मॉडेल इंग्लिश स्कूल या शाळेत दिनांक 14 ~10 ~ 2023 ,रोजी इयत्ता पाचवी ते आठवी या विद्यार्थ्यांच्या बाल सभेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अहमदपूर तालुक्याचे केंद्रप्रमुख श्री. कोनाले सर यांची उपस्थिती लाभली. या सभेसाठी प्राथमिक विभागाचे माननीय मुख्याध्यापक श्री राम क्षीरसागर सर माध्यमिक विभागाचे माननीय मुख्याध्यापक श्री विवेक कुंठेकर सर शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ.ठाकूर मॅडम ,आदरणीय ज्योती क्षीरसागर ,मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंद व इतर कर्मचारी उपस्थित होते.
बाल सभेसाठी पदभार सांभाळणाऱ्या विद्यार्थ्यांकडून उपस्थित मान्यवरांकडून प्रतिमापूजन करण्यात आले.
आश्लेषा गायकवाड, प्रांजल नकाते, दिव्या सिंहाचे, पृथ्वी आडे, चिस्ती बुश, तेजल केंद्रे ,सिद्धि, राजकन्या मुकणार, या विद्यार्थिनी नी आपल्या नृ त्याद्वारे राजमाता जिजाऊ मानवंदना दिली.
बाल सभेतील पदभार सांभाळण्यासाठी प्रसाद स्वामी, आशिष सोळुंके ,सय्यद इक्रा, कोमल गवळी, अथर्व तीर्थकर ,शुभम हनुमंते ,समर्थ अर्जुने, श्रेयस मुंडे ,या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
दिग्विजय सोळुंके सौरभ शिडो ळे ,अमीर पठाण, प्रीती ढवळे, या विद्यार्थ्यांनी आपल्या स्फूर्तीदायक भाषण आणि शक्ती व शांती या विचारधारेस नम्रतापूर्वक अभिवादन केले.
शिवम वारकड ,आयुष जाधव, प्रथमेश चव्हाण ,विक्रांत चाटे, पृथ्वी फासगे, कुणाल पाटील, या विद्यार्थ्यांनी विवेकानंद एक विचार हे नाटक तसेच जिजाऊंचा जन्म सोहळा नृत्य सामूहिकरीत्या अप्रतिमपणे सादर केले.
सांस्कृतिक व शैक्षणिक विकासासाठी बाल सभा ही अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा आविष्कार या माध्यमातून होतो असे मार्गदर्शक विचार केंद्रप्रमुख श्री कोनाळे सर यांनी मांडले.
मुख्याध्यापक श्रीराम क्षीरसागर सर व मुख्याध्यापक श्री विवेक कुमठेकर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळण्याचे काम पृथ्वीराज आडे ,राजकन्या मुकणार ,क्षितिजा पाटील ,वेरोनिका अल्हाट, या विद्यार्थी यांनी सूत्रसंचालनाच्या माध्यमातून प्रभावीपणे केले.
आदरणीय कृष्णापुरे मॅडम ,संध्या कार भारे मॅडम ,व सौ अंजली कुलकर्णी, मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले. वंदे मातरम या सामूहिक राष्ट्रमंत्राने कार्यक्रमास पूर्णविराम देण्यात आला.