
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: दैनिक चालू वार्ता पेपर हे पत्रकारिता करत करत सामाजिक कार्यामध्ये पण उल्लेखनीय काम करत असून आज देगलूर येथील राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त शोभा यात्रेमधील जिजाऊ भक्तांना दैनिक चालू वार्ता पेपर तर्फे चिवडा पाकीट व पाण्याची बॉटल वाटप करण्यात आले होते त्या यात्रेमध्ये नाशिक ढोल पथक लेझीम पथक पटनाट्य व भरली कळशी घेऊन जिजाऊ म्हणून आलेल्या मुली या शोभा यात्रेमध्ये सहभागी झाले होते देगलूर व देगलूर प्रसारातील हजारो जिजाऊ भक्त या यात्रेमध्ये सामील होऊन या यात्रेची शोभा वाढवली त्यावेळी जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणा देण्यात आले त्यावेळी दैनिक चालू वार्ता पेपर देगलूर चे प्रतिनिधी संतोष मनधरणे यांनी पुढाकार घेऊन या शोभा यात्रेतील जिजाऊ भक्तांना चिवडा पाकीट व पाण्याचे वाटपाचे नियोजन केले होते त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्याला देगलूर चे वैजनाथ स्वामी जयदीप वरखीडे दासेटवार सावकार अशोक दोसलवार शिवराज चेडके शिवलिंग बुक्कावार अमोल शिंदे सुरेश मैलागिरे कैलास ऐजगे गोवर्धन बामणे बालाजी झरे सर आधी उपस्थित होते.