
दैनिक चालु वार्ता हातकणंगले -कवि सरकार इंगळी
इंगळी चंदूर पानंद रस्ता अत्यंत खराब झालेला होता.शेतकरीवर्ग सदर पानंद रस्ता कधी होणार या प्रतिक्षेत होता.पावसाळ्यात पानंद रस्यांवर खाचखळगी असलेले व पाणी साचत असलेने पावसाळ्यात चार महिने महिला वर्ग,शेतमजुरांची पाण्यातून होणारी पायपीट व जनावरांना चारा आणणेसाठी शेतकरीवर्ग यांना त्रासदायक होता.कवि सरकार व कहीं गावातील नागरीक सदर रस्ता होणेसाठी लोकप्रतिनिधीना वारंवारनिवेदन देत होते.व दैनिक पेपरच्या माध्यमातून सतत आवाज उठवत होते.प्रशासनाने व ग्रामपंचातयीने दखल घेऊन सदर कामाची मंजूरी मिळवली. व लगेच नवनिर्वाचित सरपंच दादासो मोरे(बापू) व सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी खडीकरण व डांबरीकरणाचे
सातशे फुट लांबीचा रस्त्याच्या कामासचा शुभारंभ करणेत आला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गला दिलासा मिळाला आहे.