
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे.
देगलूर: देगलूर तालुक्यातील परिसरातील शेवाळ, शेलगाव, सांगवी रेती घाटावरुन रात्रभर वाळू उपसा जोरात होत असून महसूल विभाग मात्र कोमात असल्याने आव्वा च्या सव्वा दरात रेती टाकून आपले ऊखळ पांढरे करून घेत असताना शासनाच्या लाखो शारुपयांच्या महसूलावर डल्ला मारत असताना अधिकारी मात्र बघ्याची भुमिका घेत
आहेत.
चालू वर्षाचा रेती लिलाव झाला नसल्याने जनतेला रेतीची बांधकामासाठी नितांत गरजांसाठी दिवसा रेती उपसा केल्यास दड आकारातील या भितीपोटी रात्रभर उपसा करु नये यासाठी शासनाने पथक नेमले असून देखील ट्रॅक्टर, बोलेरो या वाहनातून देगलूर पाठोपाठ मुखेड व बिलोली तालुक्यात रेतीची सरास वाहतूक होत असताना शासनाच्या लाखोरुपयांचा महसूल बुडत असून महसूल विभाग चिरीमिरी घेऊन गप्प बसत असल्याने वरिष्ठांनी याची
दखल घेऊन अवैध होत असेलेला वाळू उपसा बंद करण्याची मागणी होत आहे.