
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
बारामती तालुका पोलिसांनी पाच दुचाकी चोरांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या १६ दुचाकी जप्त केल्या. आकाश संतोष नरुटे (वय २०, लालपुरी कळंब, ता. इंदापूर), कौस्तुभ राजू गावडे (वय २०, रा. कळंब, ता. इंदापूर), प्रथमेश तुकाराम पवार (वय २०, रा. पंढरपूर, जि. सोलापूर), सोहन संतोष साठे (वय २०, रा. माढा, जि. सोलापूर) व रोहित सुभाष घोडके (वय २०, रा. कळंब, ता. इंदापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या टोळीकडून रॉयल एनफिल्ड बुलेट, यामाहा, स्प्लेंडर, एफझेड डीलक्स, ज्युपिटर, शाईन अशा १० लाख किमतीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. या टोळीकडून आणखी काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुन्हे शोध पथक एमआयडीसी, सूर्यनगरी भागात पेट्रोलिंग करत असताना संशयास्पदरीत्या फिरणार्या आकाश नरुटे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अन्य साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी त्यांना सोलापुरातून ताब्यात घेतले.
चोरट्यांनी, इंदापूर बारामती, बारामती एमआयडीसीसह पुणे, हांडेवाडी, सातारा, शिंगणापूर, दहीवडी, टेंभुर्णी, सोलापूर, देवाची उरूळी, लोणंद, मोहोळ आदी भागातून दुचाकी चोरल्याचे तपासात स्पष्ट झाले. पुणे शहर, ग्रामीण हद्दीसह सातारा व सोलापूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील नऊ गुन्हे या टोळीने केल्याचे निष्पन्न झाले.
ही कामगिरी पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, सहायक फौजदार कोलते, हवालदार राम कानगुडे, हवालदार आशा शिरतोडे, अमोल नरुटे, बापू बनकर, संतोष मखरे, दीपक दराडे, दत्ता मदने, शशिकांत दळवी यांनी केली.