
दैनिक चालू वार्ता नांदेड/ -प्रा. यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड शहरामध्ये मकर संक्रांत दिनाचे औचित्य साधून दैनिक अर्थ या वृत्तपत्राचा पहिला वर्धापन दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला या वर्धापनदिनी दैनिक अर्थ वृत्तपत्राचे मुख्य संपादक माननीय अनुप आगाशे साहेब यांनी कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले होते या कार्यक्रमात विविध वृत्तपत्रात उत्कृष्ट पद्धतीने काम करत असलेल्या पत्रकारांचा गौरव व सन्मान भारतीय संविधानाची संविधान उद्देशिका व लेखणी देऊन करण्यात आला. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे या कार्यक्रमात ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा माजी खासदार व आमदार दिवंगत भाई डॉ. केशवराव धोंडगे साहेब यांची आवर्जून आठवण काढून त्यांच्या आदर्श विचारांचे व सामाजिक शैक्षणिक राजकीय कार्याचे स्मरण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. . दैनिक अर्थ वृत्तपत्राच्या पहिल्या वर्धापन दिना च्या कार्यक्रमात दैनिक चालू वार्ताचे नांदेड प्रतिनिधी प्रा. यानभुरे जयवंत सोपानराव तसेच श्री समर्थ दादाराव लोखंडे पाटील यांचा गौरव व सन्मान संविधान उद्देशिका व लेखणी सन्माननीय दलजीत कौर जेज मॅडम – सचिव , विधी सेवा प्राधिकरण , जिल्हा न्यायाधीश नांदेड यांच्या शुभ हस्ते देऊन करण्यात आला. . याप्रसंगी कार्यक्रमास उद्घाटक म्हणून सन्माननीय दलजीत कौर जेज मॅडम सचिव – विधी सेवा प्राधिकरण , जिल्हा न्यायाधीश नांदेड यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच माननीय श्री विनोद रापतवार ( जिल्हा माहिती अधिकारी ) माननीय श्री अनिकेत ( काका ) कुलकर्णी ( ज्येष्ठ पत्रकार ) माननीय श्री केशव घोणसे पाटील ( दैनिक गोदातीर समाचार – मुख्य संपादक ) माननीय श्री संतोष पांडागळे ( कार्यकारी संपादक दैनिक सत्यप्रभा ) माननीय श्री विजय जोशी ( दैनिक सामना जिल्हा प्रतिनिधी ) माननीय श्री प्रकाश कांबळे ( माजी विभागीय सचिव मराठी पत्रकार परिषद मुंबई ) यांच्यासह दैनिक अर्थ वृत्तपत्राचे मुख्य संपादक ऍड.अनुप आगाशे व प्रकाशक ऍड. शितल आगाशे ( क्षीरसागर ) यांची उपस्थिती प्रामुख्याने होती. . या कार्यक्रमात विविध वृत्तपत्रात काम करणाऱ्या अनेक पत्रकारांचा गौरव व मान सन्मान करण्यात आला. प्रसंगी मान्यवरांनी भारतीय संविधान आणि संविधान उद्देशिकेचे महत्त्व आपापल्या भाषणातून पटवून देण्याचा प्रयत्न केला तसेच वर्तमानपत्रेही समाज जीवनाचा आरसा असून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि तो आधारस्तंभ कायम मजबूत समाजात टिकून ठेवण्यासाठी पत्रकाराने अतिशय निर्भिड व प्रामाणिकपणाने पत्रकारिता केली पाहिजे असे विचार मान्यवराकडून ऐकव्यास मिळाले आभारा अंती अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.