
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी-सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यातील मेसखेडा येथे
वर्ष ३८ वे सालाबादा प्रमाणे या वर्षी श्री महंत रामगुरुबाबा यांच्या कृपने ह. भ. प. सेवाधारी पौळ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने दि 13-01-2023वार शुक्रवार पासून अखंड हरिणाम साप्ताह श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आरंभ.
भागवत कथेची वेळ ११ ते ४ , भागवताचार्य : श्री.ह.भ.प गुलाब महाराज बोरीकर यांच्या मधुर वाणीतून व दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ६ ते ८ नामजप,८ ते ९:३० नगर प्रदक्षणा, स १० ते ११ गाथा भजन, ११ ते ४ भागवत कथा, ४ ते ६ पंगत, ६ ते ७ हरिपाठ व रात्री ९ ते ११ हरी किर्तन व नंतर जागर. व्यवस्थापक भजनी मंडळी व गावकरी मंडळी मेसखेडा यांच्या वतीने पंचक्रोशीतील भाविक भक्तांना कीर्तन,कथा श्रावणाचा लाभ घ्यावा असेआहवान करण्यात येत आहे