दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
बदलत्या काळानुसार इंधनाचे महत्त्व ओळखून समाजात वावरले पाहिजे . महाराष्ट्र राज्य महामंडळाकडून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमात योगदान दिले पाहिजे . इंधन बचतीने राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन आपल्याला सेवा करण्याची संधी उपलब्ध होत असते असे विचार मुखेडच्या महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे यांनी प्रतिपादन केले .
इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य परिवहन महामंडळ विभागाचे सहाय्यक कार्यशाळा अधिकारी अ.आ.मडके तर प्रमुख पाहुणे रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ चंद्रकांत एकलारे आणि व्यासपीठावर वाहन निरीक्षक ए.बी.वाघमारे , एस.बी.काकडे , सहा.वाहन निरीक्षक एन.पी.कोरे , पाळी प्रमुख आय.बी.गोरे हे उपस्थित होते . सूत्रसंचालन एस.आर.गंगावणे तर आभार प्रदर्शन एस.जी.बंडे यांनी केले . आगारातील उत्पन्न वाढीसाठी यशस्वी कार्य केल्याबद्दल ए.एस.कांबळे , बी.के.कांबळे , एस.के.कांबळे , ए.वाय.गायकवाड , बी.एम.रिंदकवाले , जायभाये , कोलमवाड , चव्हाण , गोरे , कबीर या चालकांचा गौरव करण्यात आला . हा उपक्रम दि.16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणार आहे .
डॉ. एकलारे यांनी इंधनाची जागरूकता निर्माण करणे काळाची गरज आहे . हीच गरज ओळखून महाराष्ट्र राज्य महामंडळ विभागाचे आगाराकडून राबविणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले . इंधनाचे विविध प्रकार , त्याचे महत्त्व , सामाजिक बांधिलकी , राष्ट्रीय कार्यातील त्याग , मेहनत घेण्याची संधी , कृत्रिम व नैसर्गिक साधन सामुग्री , इंधन बचतीचे महत्त्व इत्यादी विषयावर विचार व्यक्त केले . अध्यक्षीय भाषणात मडके यांनी आगारात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचा उद्देश , इंधन गळती , बचत करण्याच्या पध्दती , वाहक , चालकांनी घ्यावयाची काळजी , भविष्यात इंधना शिवाय येणारी विदारक परिस्थिती इत्यादी विषयावर आपले मत मांडले . या कार्यक्रमाकरिता आगारातील अधिकारी , वाहक , चालक , तांत्रिक साहाय्यक कर्मचारी उपस्थित होते .


