दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी -मन्मथ भुस्से
कर्नाटक हुबळी धारवाड येथे 26 वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 आयोजित करण्यात आला होता.महाराष्ट्रातून प्रा.रघुनाथ शेटे ,शंकरराव चव्हाण महाविद्यालय,अर्धापुर येथील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या राष्ट्रीय सेवा योजनेचा संघ घेऊन, महाराष्ट्र व गोवा या राज्याचे नेतृत्व करत या युवा महोत्सवात 24 स्वयंसेवकांसह सहभाग घेतला.
हा महोत्सव दिनांक 12 जानेवारी ते 16 जानेवारी 2023 या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यात मूर्ती कला ,साहसी खेळ,गायन,नृत्य,युवा संवाद,खाद्य महोत्सव, हस्तकला प्रदर्शन,चित्रकला,इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
युवा महोत्सवाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले.या प्रसंगी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई,केंद्रीय क्रीडा व युवा मंत्री अनुरागसिंग ठाकूर,राज्यपाल थावरचंद गहॅलोत,केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत होती.
या युवा महोत्सवात भारतातून 36 राज्यातील 7600 युवक सहभागी झाले होते. राष्ट्रीय सेवा योजना साठी असणारा युवासंवाद यात महाराष्ट्रातुन रासेयो स्वयंसेवक मयूर भिसे,रोहिणी डोंगरे,अंकिता क्षीरसागर या युवकांनी युवा संवाद मध्ये उत्कृष्ट प्रश्न विचाल्या बद्दल पारितोषिक पटकावले.
या बद्दल त्यांचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले,प्र.कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन,राष्ट्रीय सेवा योजना रिजिनल डायरेक्टर डॉ. डी.कार्तिगेयन , कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे,राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.मल्लिकार्जुन करजगी,यांनी संघव्यवस्थापक डॉ.रघुनाथ शेटे व सहभागी स्वयंसेवक यांचे अभिनंदन केले.


