दैनिक चालु वार्ता हातकणंगले प्रतिनीधी – कवि सरकार इंगळी
नाशिक जिल्ह्यातील ग्रामिण कवी लघूलेखक संपादक श्री साहेबराव नंदन यांच्या बहुचर्चित प्रकाशन नाशिक यांनी प्रकाशित केलेल्या ॥ गावगाडा ॥ ह्या काव्यसंग्रहास महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती यांचा राज्यस्तरिय साहित्य क्रांती २०२३ पुरस्कार नुकताच मुंबई च्या युवक मंडळ बालविकास कल्याण केंद्र हॉल शिंपोली बोरिवली वेस्ट येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला . मी आणि माझ्या कविता राज्यव्यापी काव्यसमूह आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मा . श्री गोपाळ शेट्टी खासदार मुंबई उपनगर ‘ संगितकार मा . अमित गवारे गायक सोमनाथ गायकवाड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ‘ कवयित्री मा . आशाताई ब्राम्हणे महाराष्ट्र महिला विभाग प्रमुख कलावंत समिती ‘ कार्यक्रमाचे अध्यक्ष गझलकार श्री विजय जोशी ‘ पुष्प रत्न साहित्य समुहाचे संस्थापक अध्यक्ष मा . प्रा . डॉ . आनंद आहिरे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला . गावगाडा काव्यसंग्रहास राज्यस्तरिय पुरस्कार मिळाल्याने जिल्हाभरातून साहेबराव नंदन यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .


