दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
पुणे दि. बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी वंचित बहुजनांच्या उन्नती व अस्मितेसाठी एक मोठी घोषणा केली असून मनपा जिल्हा परिषद नगर परिषद सह विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील कोणत्याही राजकीय पक्ष किंवा गटासोबत हात मिळवणी करणार नसून बहुजन जनता दल सर्वच निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी जाहीर केले आहे.
बहुजन जनता दल पुणे जिल्हा शाखेच्या वतीने नववी पेठ पुणे येथील जी एम सभागृह येथे रविवार दि १५ जानेवारी रोजी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सप्ताह कार्यक्रमा अंतर्गत अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे बोलत होत.
वंचित बहुजन आघाडी कोणत्या गटाची युती करणार या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करीत नसून राजकीय पक्षात व राज्यातील जनतेत संभ्रम निर्माण करीत असून बहुजन जनता दलाकडे समविचारी पक्षाकडून युती संदर्भात प्रस्ताव आल्यास त्या प्रस्तावावर बहुजन जनता दल नक्कीच विचार करेल असेही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी म्हटले आहे.
रिपाइं (आठवले गट)
पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांच्या नेत्यांना समाजाच्या आर्थिक विकासासाचे काही घेणे देणे नसून फक्त हे नेते आपल्या सोयीनुसार समाजाला ठेवीत धरुन राजकारण करीत आपला व आपल्या परिवाराचा कसा आर्थिक विकास होईल याच राजकारणाकडे यांचे लक्ष असल्याचे मतही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी व्यक्त केले.
बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून बहुजन जनता दल व महिला आघाडी.युवा आघाडी.वैधकिय कामगार आघाडी.फिल्मसिटी आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांना भेटून त्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.
बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला बहुजन जनता दल नगर पंचायत विद्यमान नगरसेविका प्रमोदिनी डावखरे.माजी नगरसेवक केशव गंगणे.रामदास डोरले.सौ शिलाताई जातेकर.(ग्रामपंचायत सदस्य) रामचंद्र साबळे (ग्रामपंचायत सदस्य)सौ नीताताई पाटील (ग्रामपंचायत सदस्य) अंकुश पवारे (प्रदेश उपाध्यक्ष)संजय वानखडे (प्रदेश स़घटक)शांताराम गावंडे पाटील( प्रदेशसचिव)अरुण बरगडे. (बहुजन जनता दल पुणे जिल्हाध्यक्ष)सौ.सरीताताई मानकुळे (महिला आघाडी अध्यक्षा पुणे जिल्हा) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहुजन जनता दलाचे खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष गोपाल काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष किशोर ठाकरे यांनी केले यावेळी जोखान सय्यद बंडू जाधव शिवाजी कांबळे विशाल माने किशोर चौधरी शांताराम यवतकर दिपक कांबळे विशाल खंडेराव सचिन गोस्वामी तुलसीदास तरडे छबुताई तायडे मिना खांडेकर सुनिता राऊत कमलाबाई ओगले संगिता भुरे वच्छला शेळके ज्योती पवार सुशीलकुमार थारकर सुभाष सुरवाडे किशोर कदम याकुब शाहा महेंद्र इंगळे धनराज माने हिम्मत पाटील रोहित लांडगे राजेश जानकर प्रा भाऊसाहेब शिंदे दादासाहेब गायकवाड नाथसागर पळसकर सह अनेक बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे बहुजन जनता दलाचे युवा प्रदेशाध्यक्षध्यक्ष प्रतिक दाभाडे यांनी कळविले आहे


