दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे
मंठा.
संचालक वैजनाथ बोराडे यांच्या कार्याचा इंदुरीकर महाराज यांनी केला गौरव
———-———————————-
शरीर संपत्तीचे जतन प्रत्येकाने करायला पाहिजे.निर्व्यसनी व निरोगी शरीर सर्वात मोठी संपत्ती आहे.जीवन आनंदी व समाधानी जगायचे असेल तर उत्तम आरोग्य राखणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी मंठा येथे आयोजित कीर्तन सोहळ्यात बोलताना केले.
मंठा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजनाथ बोराडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त
बाजार समितीच्या परिसरामध्ये विश्वराज कंट्रक्शन व बाजार समिती संचालक वैजनाथ बोराडे मित्र मंडळाच्यावतीने आयोजित एक दिवसीय कीर्तन सोहळ्यात इंदुरीकर महाराज बोलत होते.शिवसेना जिल्हा प्रमुख ए.जे.बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे स्वागत आबासाहेब बोराडे , बाजार समिती संचालक वैजनाथ बोराडे , रंगनाथराव खरात ,बाबासाहेब बोराडे यांनी केले.
कीर्तनामध्ये पुढे बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले की , सामाजिक जीवनात माणसाने आपले नीतीमूल्ये जपण्यासह समाधानी आयुष्य जगले पाहिजे. सात्विक आहाराचे अनेक फायदे आहेत सात्विक आहारामुळे चांगले शारीरिक आणि मानसिक संतुलन राहण्यास मदत होते.त्यामुळे सात्विक आहार घेऊन आरोग्य निरोगी ठेवावे. आपल्या खास शैलीतून इंदुरीकर महाराजांनी शहरातील नागरिकांचे प्रबोधन केले. शालेय जीवनात मुलांना महागड्या मोबाईलची गरज काय ? असा प्रश्न उपस्थित करून शाळेत मोबाईलवर वेळ घालवतात हे सर्व चिंताजनक असून शाळेच्या आवारामध्ये मोबाईल वापरावर बंदी आणणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.तसेच छोट्या-छोट्या कारणावरून आपसामध्ये भांडणे करून काही उपयोग नाही.संयम बाळगणं गरजेचे असल्याचे यावेळी बोलुन दाखविले. यावेळी इंदुरीकर महाराजांनी सध्याच्या घडामोडींबाबत अनेक उदाहरणे देत आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधन केले.याप्रसंगी महिला , मुले व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर महाराज यांनी बाजार समिती संचालक वैजनाथ बोराडे यांनी केलेल्या सामाजिक कार्यचे कौतुक करत बोराडे यांचा गौरव केला.


