दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान दि.३० जानेवारी रोजी होणार आहे.यादिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याचे निर्देश संबंधित आस्थापनांना देण्यात आले आहेत.
ही रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल अशी तदतूद आहे.यादिवशी मतदारांनी मतदानपद्धतीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे,असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केले.


