दैनिक चालु वार्ता हातकणंगले प्रतिनीधी – कवि सरकार इंगळी
हिंदवी स्वराज्य ट्रष्ट राळेगणसिद्धी येथे महाराष्ट्र महिला विकास मचं यांचे वतीने साऊ,जिजाऊ,रमाई यांचे नावे त्रिमूर्ती महिलांच्या प्रेरणा पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मभूषण,या.श्री. समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचे हस्ते व या. श्री आमदार निलेशजी लंके साहेब, मा.श्री.शेखरजी मुंदडा, मा.अँड वर्षाताई देशपांडे,,मा.श्री.प्रमोदजी झिंजाडे यांचे उपस्थीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, कालिंदीताई ठुबे पाटील, महिला महाराष्ट्र विकास मंच अध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.
विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय,काय,स्वओळख निर्माण करणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करणेत येणार आहे.
या कार्यक्रमाने निमंत्रक विनिता दिवेकर उपाध्यक्षपदी राज्यसमिती,रेवती आढाव,महासचिव, उज्वला साळवे सचिव,मीनल कुडाळकरप.म.विभागीय अध्यक्ष,सुधाकर चौधरी,प्रसिद्धि प्रमुख असून कार्यक्रम यशस्वी करणेकरीता परिश्रम घेत आहेत.या नियोजना मधे महाराष्ट्र महिला विकास मंच ची टीम कार्य करत आहे. ज्योती ठाकरे
(विभागीय अध्यक्ष विदर्भ वाशिम) सविता चिपकर
(विभागीय अध्यक्षा कोकण विभाग)सुरेखा डॉंग
(विधीतज्ञ राज्य)
मीना शेळके (नवी मुंबई) कल्पना रेवगडे (नासिक)डॉ भारती पाटील( सांगली )सुप्रिया शिंदे (कोल्हापूर) अनिता काळे (अहमदनगर) अनिता कांबळे (बीड)मेरी फर्नांडिस ( पुणे शहर) अश्विनी अवताडे (वाशिम )यूगेश्वरी हरणे. (अकोला)प्रज्ञा डोंगरे (अमरावती)पुनम ताई शेंडे (यवतमाळ)


