दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सिध्दनाथ :- नांदेड तालुक्यातील मौजे सिध्दनाथ येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.श्री.सोमगीर महाराज टाकळगावकर ,जथेदार बाबा तेजासिंगजी गुरूद्वारा मातासाहेब देवाजी व श्री श्री १०८ महंत प्रयागगीरी महाराज वाडी पुय्यड , श्री.किशन महाराज पुजारी देवस्थान, श्री.जनार्दन महाराज पुणेगावकर यांच्या कृपाआशीर्वादाने ह.भ.प.बालाजी महाराज पुणेगावकर ,ह.भ.प.दत्ता महाराज मुगट , श्री.ह.भ.प.रामेश्वर महाराज गुडगे,ह.भ.प.गणेश महाराज पवार आमदुरा , सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.पहाटे ४ ते ५ काकडा ,६ते ७ विष्णू सहस्त्रनाम ,७ते ११ श्री ज्ञानेश्वरी पारायण,११ते १२ गाथा भजन, दररोज १ते५ श्रीमद् भागवत कथा , संध्या.६ते ७ हरीपाठ रात्री ९ ते ११ हरी किर्तन दि.१७ जानेवारी ह.भ.प.रामराव महाराज ढोक,दि.१८ जानेवारी ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील,दि.१९ जानेवारी ह.भ.प.सोपान महाराज सानप,दि.२० ह.भ.प.चंद्रशेखर महाराज देगलूरकर,दि.२१ जानेवारी ह.भ.प.संजय महाराज हिवराळे यांचे काल्याचे किर्तन सकाळी ९ ते ११ वाजता होईल.दि.१४ ते २० जानेवारी ह.भ.प.शिवाजी महाराज वटंबे यांचे १ ते ५ संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ. मृदुंग सम्राट विठ्ठल महाराज कावळे. पालखी सोहळा दि.२० शुक्रवार जानेवारी दुपारी १ वाजता श्री.शिवानंद स्वामी महाराज यांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात येईल.अमावस्या शनिवार दि.२१ जानेवारी सकाळी महाप्रसाद (भंडारा) समस्त गावकरी मंडळी सिध्दनाथ, व्यवस्थापक नागापूर,पुणेगाव ,पुय्यडवाडी , वांगी,आमदुरा,वासरी,मुगुट, वडगाव,मिश्री पिंपळगाव, कार्यक्रमाचे स्थळ श्री.शिवानंद स्वामी तिर्थक्षेत्र सिध्दनाथ महाद्वारापासून उत्तरेस १ की. मी.अतंरावर श्री शिवानंद स्वामी तिर्थक्षेत्र आहे. वरील सर्व कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी सिध्दनाथ ता.जी.नांदेड यांनी केले आहे.


