दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी:संतोष मनधरणे
देगलूर:रस्ता सुरक्षा अभियान
“सडक सुरक्षा, जीवन सुरक्षा” सप्ताह दि.11 जाने. ते 25 जाने 2023 अंतर्गत परिवहन महामंडळ देगलुर येथे उप जिल्हा रुग्णालय देगलुर येथील वैधकिय अधिक्षक डाॅ.एस.एस.वलांडे सर यांच्या आध्यक्षतेखाली आरोग्य शिबीर घेण्यात आले. यामध्ये BP, शुगर, HB, HIV तपासणी, तसेच परिवहन महामंडळ कर्मचारी यांचा रस्ता सुरक्षा अभियान संदर्भात मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. यावेळी रुग्नालयातील असंसर्गजन्य रोग कार्यक्रम (NCD)चे वैधकिय अधिकारी डॉ. उस्माण सर , 108 वाहणाचे वैधकिय अधिकारी डाॅ बालाजी गुजे सर,आयुष विभागाचे वैधकिय अधिकारी डाॅ. संजय लाडकेसर,डाॅ काझी सर ,NCD अधिपरीचारीका पल्लवी चव्हान ,NCD समुपदेशक छाया पाटील, सिकलसेल प्रयोगशाळा अधिकारी जयश्री बाबळे ICTC समुपदेशक साहेबराव कुमार,मैञ क्लिनीक समुपदेशक रमेश जाधव,108 वाहण चालक गणेश दंडीमे, उपस्थित होते आगारातील एकुण 75 कर्मचा-यांची तपासनी करण्यात आली त्यामध्ये 10 बि.पी.( HTN) 9 शुगर( DM) व 2 रुग्न Oral चे निघाले यांना समुपदेशन करण्यात आले पुढील तपासनी साठी उप जिल्हा रुनालय देगलुर येथे पाठवण्यात आले तसेच परिवहन महामंडळचे आगारप्रमुख उपस्थित होते.


