दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी:-संतोष मनधरणे
देगलूर: आज नांदेड येथे
मा. शिक्षणाधिकारी साहेब (प्रा.) शिक्षण विभाग
जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्रा. शिक्षक शिक्षकेत्तर महासंघ जि. नांदेड यांच्या वतीने निवेदन देण्यात आले दि.14./12./2022 च्या पत्रानुसार आपण अधिक्षक वेतन पथक (प्रा.) च भविष्य निर्वाह निधी कार्यालय नांदेड यांना आदेशित केले आहे की, ज्या शाळांनी आ.टी.ई. मान्यता प्रमाणपत्र जानेवारी 2023 च्या बिलासोबत जोडले नसेल तर त्या शाळांचे वेतन अदा करण्यात येऊ नये. हा आदेश अनैसर्गिक असून अशा पध्दतीने पगार थांबवणे योग्य नाही. काही तांत्रिक अडचणीमुळे कारणास्तव काही शाळांना आर.टी.ई. मान्यता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाहीत. त्या अडचणी दूर होताच संबंधीत शाळा सदरील प्रमाणपत्र प्राप्त करुन घेतील. तेव्हा आपणास विनंती की, सदरील आदेश रद्द करून माहे जानेवारी 2023 चे व पुढील महिन्याचे वेतन थांबवण्यात येऊ नये.
अध्यक्ष
श्री हरिभाऊ चव्हाण लोहा
कार्याध्यक्ष
श्री जाधव एल. एम. नांदेड
सचिव
श्री हणमंतराव डाकोरे, देगलूर
ता. देगलूर ता अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्रा. शिक्षक शिक्षकेत्तर महासंघ जि. नांदेड आधी पदाधिकारी उपस्थित होते


