दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ शिक्षकांचा होणार गौरव
स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन अर्थात सर फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणाऱ्या नॅशनल टीचर्स अवॉर्ड 2022 प्रयोगशील शिक्षक यांना जाहीर झाला असून यामध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, व क्षेत्रीय अधिकारी यांचा समावेश आहे. सर फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तर नवोपक्रम स्पर्धा 2022 मधून या शिक्षकांची निवड करण्यात आलेली आहे. पुरस्काराचे वितरण मार्च 2023 मध्ये होणाऱ्या विशेष एज्युकेशन कॉन्फरन्स मध्ये गौरव होणार असून आठ शिक्षकांचा सहभाग आहे.
1.श्री.चिवडे बाळासाहेब मोहनराव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसला खुर्द,
2. श्रीमती.रेणके महादेवी
सुरेश संभाजीनगर जळकोट
3.श्रीमती. माने अनिता शेषेराव प्राथमिक शाळा कोन्हाळी उमरगा
(4. श्री. विक्रम बलभीमराव पाचंगे मानमोडी तालुका तुळजापूर)
5. श्रीमती. होमकर शितल विठ्ठलराव प्राथमिक शाळा काटगाव
6.श्री. हिरेमठ चिदानंद नागय्या प्राथमिक शाळा धोत्री
7. श्री दिलीप बाबुराव गरुडकर के डी शेंडगे हायस्कूल उमरगा
8.श्री. खोसे उमेश रघुनाथराव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबा नगर
यांचा समावेश समावेश आहे. स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी श्री.गुणवंत चव्हाण, श्री. शिवाजी चव्हाण श्री. उमेश खोसे ,श्री .समाधान शिकेतोड श्रीमती .मंजुषा स्वामी या सर्व जिल्हा समन्वयक यांनी परिश्रम घेतले.


