दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड – अंगद कांबळे
सामाजिक,सांस्कृतिक,क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत असलेली महाड – पोलादपूर तालुक्यातील यादव-गवळी समाज मंडळाचे वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन खासदार सुनिल तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.मकर संक्रातीच्या शुभदिनी मौजे सुतारवाडी येथे संपन्न प्रकाशन कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस महादेव पाटील,गवळी समाज मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चिले,उपाध्यक्ष विजय दिवेकर,सचिव अनिल महाडीक,सहसचिव सदानंद महाडीक,खजिनदार मनोहर महाडिक,विश्वस्त मनोहर दिवेकर, तुकाराम खेडेकर,बाळु तांबडे,संतोष डिगे,निलेश महाडीक,महेश तटकरे,मंगेश गायकर,राजेंद्र महाडीक,गिरीश गायकर
आदी समाज मान्यवर उपस्थित होते.या वेळी महाड – पोलादपूर तालुक्यातील यादव-गवळी समाज बांधव- भगिनींचे स्वप्न साकार करण्यासाठी समाजाचे नियोजीत भव्य संकुल उभारून मिळावे यासाठी उपस्थित समाज मान्यवरांनी खासदार सुनिल तटकरे यांच्या कडे आर्थिक सहकार्य करावे अशी विनंती केली.


