दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.
मंठा.. तालुक्यातील बरबडा येथे अखंड हरीनाम साप्ताह सुर्यनारायण विष्णु याग यज्ञ (तिन दिवस) श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व रथ सप्तमी निमित्त किर्तन सोहळा आयोजन श्री सुर्यनारायण मंदिर बरबडा येथे दि. 22 जानेवारी २०२३ ते 28जानेवारी २०२३ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. सदर भागवत सप्ताहाच्या निमित्ताने भागवत प्रवक्ता श्री शिवाजी महाराज गायकवाड अमृतमय वाणीतून श्रीमद भागवत सप्ताह मार्गदर्शन करणार आहे. तरी या कथा अमृताचे रसपान करुन आपली जीवन नौका भवसागरातून पार करावी असे आवाहन सुर्य नारायण संस्थांनाचे रामकिसन महाराज व आयोजकांच्या वतीने करण्यात आले या सप्ताहात नारायण महाराज तनपुरे, महंत महामंडलेश्वर अमोलानंद महाराज, मेहकर, उध्दव महाराज राऊत, कृष्णा महाराज रासवे, रामकृष्ण रंधवे, ज्ञानेश्वर महाराज मुडेकर, सतिष महाराज जाधव शास्त्री यांच्या अमृतुल्य वाणीतून किर्तनाचा व भागवत कथेचे मार्गदर्शन लाभणार आहे. सप्ताहानिमीत्त किर्तन सोहळा, काकडा, भजन, श्रीमद भागवत कथा, हरिपाठ व हरिकिर्तन, हरिजागर कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची सांगता शनिवार (28) रोजी होणार आहे.
काकड आरती,सकाळी 4 ते 6 वा. काकडा दु. 10ते 4 भागवत कथा सांय ४ ते ७ हरीपाठ , 8:30 ते 10:30कीर्तन असे दररोज दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी सदर कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन श्री क्षेत्र सुर्यनारायण मंदिर संस्थान बरबडा येथील आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


