दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यात 35 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची संपुर्ण प्रक्रिया पार पडली. मागील पंधरवड्यात नवीन सरपंचाचे पदभार तसेच उपसरपंचाची निवड प्रक्रियाही पार पडली. या ग्रामपंचायतीमध्ये..| नवीन कारभारी आता गावा विकासाच्या कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणारी कामे यासाठी गाव कारभाऱ्यांनी नियोजनाला सुरुवात केली आहे..
मागील ३-४ महिन्यापासून निवडणूक प्रक्रियेत कालावधी गेला. शिवाय जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अनेक | योजनाही या काळात प्रभावित झाल्या. शिवाय ग्राम स्वच्छता अभियानांतर्गतही गावे दूर राहिली. त्यातच आता तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीत नवा गडी नवा राज शासन सुरू झाले आहे. काही दिवसापूर्वीच १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गावात विकासात्मक कामे करण्यात यावी, असे सुचविण्यात आले होते. दरम्यान 5 ते 6जानेवारी या कालावधीत |सरपंचाचा पदभार व उपसरपंचाची निवड प्रक्रिया पार पडली. या कारभाऱ्यांनी गाव विकासाच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणीसाठी अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींचे मत जाणून घेवून हे पुढारी कामाला लागल्याचे दिसत आहेत. मात्र अनेक ग्रामपंचायतीत या प्रक्रियेला घेऊन वाद विवादही होत असल्याचे टिसन येत आहे.


