दैनिक चालु वार्ता पेठवडज प्रतिनिधी- आनंदा वरवंटकर
पेठवडज :- कंधार तालुक्यातील पेठवडज येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आनंद नगरी चे आयोजन करण्यात आले होते. आनंद नगरी चे उद्घाटन रुई केंद्रप्रमुखश्री.व्ही.डी.जाधव.व
मुख्याध्यापक श्री.पी.जी.कारभारी यांच्या हस्ते करण्यात आले. आनंद नगरीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आनंदनगरी ठेवण्याचा उद्देश हा आहे की,सध्या विद्यार्थी पन्नास , शंभर रुपये सहज खर्च करतात. पण तेच कमावण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे विध्यार्थ्यांना कळावे आणि ते त्यांना आनंद नगरीमुळे कळाले. पैशाची देवाणघेवाण कशी करावी. मोठ्या व्यक्तींना कसे बोलावे. याची सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती झाली
प्राथमिक विभागाचे प्रमुख श्री.एस.एन.धूत, श्री .इंगळे.एस.ई,सौ कवटीकवार. मॅडम, श्री.पवळे.एम.एन,व श्री.टोकवाडे मारूती यांनी आनंद नगरी साठी सहकार्य केले.


