दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा : – शेलगाव येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण अखंड हरीनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या सांगता प्रसंगी म्हणजे दुधात शर्करा प्रमाणे महारूद्र मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन आज करण्यात आले असुन पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी यांचा लाभ घ्यावा असे सप्ताह संयोजन समिती व गावकरी मंडळी शेलगावच्या वतीने कळवण्यात आले आहे.
या अखंड हरीनाम सप्ताहात श्रीमद भागवत कथा सात दिवस महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य श्री ह भ प जगदिशानंद महाराज शास्त्री यांच्या रसाळ वाणीतून श्रोत्यांना ऐकावयास मिळाली व राञी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामवंत किर्तनकार महाराज मंडळींचे किर्तन सात दिवस ऐकावयास मिळाले गांवकरी मंडळींच्या वतीने अतीशय सुंदर सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते व आज शेवटच्या दिवशी काल्यांची किर्तनसेवा गुरूवर्य श्री ह भ प माऊली महाराज मुडेकर यांची होणार असुन परीसरातील सर्व भाविक भक्तांनी व श्रोते मंडळींनी काल्याची किर्तनसेवा व कलशारोहण सोहळ्याचा लाभ घ्यावा असे सप्ताह संयोजन समिती व गावकरी मंडळी शेलगावच्या वतीने कळवण्यात आले आहे.


