दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी:- संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्याचे भूमिपुत्र शिवानंद नागभूषण शिवाचार्य यांची गटशिक्षण अधिकारी पदी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यामध्ये नियुक्ती झाली यांची गट शिक्षणाधिकारी निवड झाल्याबद्दल माननीय शिवानंद नागभुषण शिवाचार्य सर यांचे सत्कार करण्यात आला आयोजक वैजनाथ स्वामी माळेगावकर व उपस्थित सोमनाथ स्वामी माळेगावकर, अशोक शेरे,बालाजी स्वामी देगलूर,रेवनआप्पा मठवाले येरगीकर, व दयानंद मठपती शिवणीकर यांनी त्यांचा सत्कार केला .शिक्षक म्हणून नागभूषण सरांची नेमणूक06/07/ 1992 रोजी जि.प.शा.धामनगाव ता.आष्टी जि.बीड. प्रथम नियुक्ती झाली व तसेच त्यांचे सेवा 1992ते 97 बीड व 97 ते 2005 नांदेड व 2005 ते 2022 देगलूर अशी त्यांची सेवा नांदेड जिल्ह्याला लाभली व तसेच 1 सप्टेंबर 2022 रोजी अराजपत्रित पदोन्नती त्यांना प्राप्त झाली व 01 जानेवारी 2023 रोजी राजपत्रित पदोन्नती गटशिक्षण अधिकारी हिमायतनगर येथे पदाचा पदभार स्वीकारला तसेच त्यांच्या कारकिर्दीमध्ये तालुकास्तरीय गुरुगौरव पुरस्कार 2007 मध्ये प्राप्त झाला व जिल्हा परिषद नांदेड गुरुगौरव पुरस्कार 2009 मध्ये यांना प्राप्त झाला
त्यांच्या या गटशिक्षण आधिकारी पदी नियुक्ती झाल्यामुळे देगलूर व देगलूर परिसरातील नागरिकांनी अभिनंदनचा वर्षाव करत आहेत.


