दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””” “””””
परभणी : राज्यात सत्तांतर होऊन कारभाराची धुरा योग्य रितीने सांभाळत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष व त्यांच्या कारकीर्दिवरच प्रश्न चिन्ह उभे केले जात आहे. न्यायालयीन स्तरावर दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप आणि खरे कोण-खोटे कोण याविषयी निकराची लढाई मोठमोठे विधिज्ञ लढत आहेत. अभी भी फैसला होना बाकी है, फिर भी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात मात्र अगदी झुंडीच्या झुंडी कोणी वर्षा बंगल्यावर तर कोणी जमेल तेथे मोठ्या संख्येने प्रवेश करीत आहेत. असाच एक प्रवेश कार्यक्रम मुंबईत घडून आला आहे. त्याची मोठी चर्चा मागील काही दिवसांपासून सोशल मिडीयावर होत असतांनाच अनेकांना खरी न वाटणारी ती घटना आता मूर्तरुपात आली आहे. ज्यामुळे अनेक राजकीय पक्षांना जबरी धक्का बसला जाणे स्वाभाविक आहे.
परभणी जिल्ह्यात खासदार व स्थानिक आमदार हे दोघेही उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहेत. त्यांनी उध्दव ठाकरे यांच्याच शिवसेनेत कायम राहू असे ठामपणे सांगितले आहे. कार्यकर्त्यांचा डोलारा सुध्दा त्यांच्या समवेत मोठा आहे. असं असलं तरी सभोवतालच्या परिसरात, तालुके आणि जिल्हा परिसरात मात्र बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यावर अनेकांनी भर दिल्याचे दिसून येत आहे.
पाथरी व मानवत तालुक्यातील असंख्य गावांचा कारभार सांभाळणारे विविध राजकीय पक्षांचे अनेक सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य व अन्य काही जणांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश मिळविला आहे. असं झालंच नाही किंवा होणारही नाही असं म्हणणाऱ्या अन्य पक्षीय नेत्यांना मात्र या प्रवेशाने पूरते उघडे पाडले आहे. यावेळी पाथरी येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे युवासेना नेते सईदखान ऊर्फ गब्बर यांचीही उपस्थिती होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करु, त्यांच्या कुशल नेतृत्वाखालील सरकार द्वारा शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर यांच्या हितासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम निष्ठेने करु असे अभिवचन देणारे व ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यात पुढील गावकारभाऱ्यांचा समावेश आहे. अरुणा विष्णू ठोसरे, सरपंच, सारोळा बु. (राष्ट्रवादी), किरण भगीरथ टाकळकर, उपसरपंच, दिगंबर भानुदास तायनाक, उपसरपंच, टाकळगव्हाण, भारत साधणे, सरपंच, चाटे पिंपळगाव, क्रांती गजानन सहजराव, सरपंच, फुलारवाडी, गीता हनुमान नवले, उपसरपंच, लक्ष्मीकांत तिडके, सरपंच, मुदगल, विलास दारकुंडे, उपसरपंच, बाबुलतार, कैलास दारकुंड, सरपंच, (ठाकरे गट) विटा, महादेव शंकरराव हारकाळ, उपसरपंच, मुरली पौळ, उपसरपंच, तारुगव्हाण, संगीता विजय पवार, सरपंच, आनंदनगर, अनीता भीमराव राठोड, उपसरपंच, सतीष आडसकर, सरपंच, तुरा (राष्ट्रवादी), भारत ढाण, सदस्य, व्यंकट गिते, सरपंच, डाकू पिंपरी, भागवत शिंदे, सदस्य, ढालेगाव, मुंजाभाऊ बळीराम वाघमारे, सरपंच, बांदरवाडा, अरुणाबाई सुदामराव गलबे, सरपंच, देवेगाव, संतोष जगन्नाथ गलबे, उपसरपंच, आबासाहेब कोल्हे, सरपंच, कासापूरी, शामराव गोंडे, सरपंच, पोहेटाकळी यांनी तर मानवत तालुक्यातील रेखाताई अशोकराव चव्हाण, वझूर, सरपंच, सुदामती पांडुरंग चव्हाण, उपसरपंच, विजय अशोकराव नांगरे, उपसरपंच, पोहंडूळ, (ठाकरे गट), रेखा पांडुरंग जुंबडे, उपसरपंच, कुंभार, ज्ञानेश लांडगे, उपसरपंच, नांदापूर, अशोक रसाळ, सदस्य, अनील कदम, उपसरपंच, मंगरुळ, शिवाजीराव उक्कलगावकर पाटील, उक्कलगाव पं. समितीचे माजी सभापती तथा सदस्य, गणेश नाईक, उपसरपंच, रामपूरी आदींनी प्रवेश केला आहे. एकूणच काय तर शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या परभणी जिल्ह्यात बऱ्यापैकी वाढीस लागली आहे. त्यामुळे ठाकरे गटाबरोबरच अन्य पक्षालाही गळती लागली जाईल की काय, जणू अशीच चर्चा जोर धरु लागली आहे.


