दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड : – लोहा तालुक्यातील व नांदेड दक्षिण मतदारसंघातील मौजे दगडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते इस्माईल बाबुशा शेख यांचे नुकतेच काही दिवसापूर्वी मोटारसायकल अपघातामध्ये दुःखाद निधन झाले आहे.
त्यांच्या या निधनाबद्दल आ.मोहन अण्णा हंबर्डे यांनी तीव्र दुःख व्यक्त करुन कालवश इस्माईल शेख यांच्या दगडगाव येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे, कालवश इस्माईल शेख यांचे मोठे बंधू इमाम साब शेख, मुलगा सादिक ,मेराज आदी उपस्थित होते.


