
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा..
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा प्रथमच जालना जिल्ह्यातील वाटुर नगरी येथील शेतकरी मेळाव्याला आले असता हजारो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चारी बाजूने गराडा घालत, पुष्पगुच्छ, बुके यासह फटाक्यांची आतिषबाजी, क्रेन द्वारे पुष्पमाला, गगनभेदी घोषणा, अनाथाचा नाथ आहे एकनाथ आशा घोषणाने वाटुर नगरी दुमदुमून गेली.
राजाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाटूर नगरीमध्ये आगमन श्री.श्री रविशंकर महाराज यांच्या ‘शेतकरी मेळाव्या’प्रसंगी हेलिपॅडने झाले असता मंठा तालुक्यातील उभरत नेतृत्व बाळासाहेबांची शिवसेना मंठा तालुका अध्यक्ष उदयसिंह बोराडे यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मा.आमदार बबनराव लोणीकर साहेब, माजी मंत्री अर्जुन खोतकर,अभिमन्यू खोतकर, मोहन अग्रवाल, मा सभापती प्रल्हादराव बोराडे, उदयसिंह बोराडे, सरपंच डॉ.संदीप मोरे,सरपंच परमेश्वरराव उबाळे,गजानन कापसे, गणेश बोराडे, दिलीप हिवाळे, चांदभाई पठाण,ॲड राजेश खरात, लिंबाजी बोराडे, विनोद खरात यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.